संपूरन सिंग (1936) हे कवी, गीतकार, नाटककार, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आहेत. ‘गुलजार’ या नावाने हिंदी आणि उर्दू भाषेत लेखन केले आहे. चाळीस वर्षाहून अधिक काळ चित्रपटांसाठी लेखन केले आहे. ‘मेरे अपने’, ‘आँधी’, ‘मौसम’, ‘परिचय’, ‘इजाजत’ व अनेक चित्रपटांसाठी गीतलेखन केले आहे. त्यांनी कुसुमाग्रजांच्या कवितांची हिंदी व उर्दूत ‘कुसुमाग्रजकी चुनी सुनी नगमें’ या नावाने अनुवाद केला आहे. त्यांना 2002 चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच त्यांना 2004 चा ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळाला आहे. गीतलेखनासाठी ग्रॅमी, ऑस्कर अॅवार्ड मिळाले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा