रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

सुषमा देशपांडे

सुषमा देशपांडे (जन्म 1955) मूळच्या प्रायोगिक रंगभूमीच्या कलाकार आहेत. सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यावर संशोधन करून हे चरित्रनाट्य लिहिले व नाटकापेक्षा हा एकपात्री वेगळा प्रकार करायचे ठरविले. आतापर्यंत या नाट्याचे 2500 प्रयोग झाले आहेत. ‘एशियन नाईटस’द्वारे परदेशातही याचे प्रयोग केले आहेत. त्याबद्दल त्यांना महाराष्ट्र सरकारचा ‘सावित्रीबाई फुले’ पुरस्कार मिळाला आहे. तसेच संत्र स्त्रियांवरील ‘बया दार उघड’ या नाटकाला महाराष्ट्र फौंडेशनचा पुरस्कार मिळाला आहे. खेडेगावातील स्त्रियांच्या ‘बचत गट’ या संकल्पनेसाठी 23 वर्षे कार्य केले आहे. त्यासाठी ‘मुक्ताईची पाऊलवाट’ हे मासिक चालविले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...