रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

रा. रं बोराडे

रावसाहेब रंगराव बोराडे (जन्म 1940) यांची कथा ग्रामीण जीवनावर आधारलेली आहे. ग्रामीण जीवन, ग्रामीण व्यक्तिरेखा, त्यांच्या कथा व व्यथा याचे सुरेख चित्रण त्यांच्या कथांतून केले आहे. ग्रामीण जीवनातील उणिवा, तेथील दारिद्र्य याबद्दल वाटणारी खंत ठिकठिकाणी जाणवते. त्यांची भाषा ग्रामीण मातीत जन्मली व वाढली आणि त्यामुळे त्या भाषेतील सर्व लकबी, त्यातील रांगडेपणा तसाच गोडवा त्यांच्या कथेत आढळतो. म्हणूनच त्यांची कथा मनात घर करून राहते. ‘माळरान’, ‘बोळवण’, ‘मळणी’ इ. कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. ‘मळणी’ या कथासंग्रहाला व ‘पाचोळा’ या लघुकादंबरीला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...