रविवार, १० ऑक्टोबर, २०२१

शाहीर राम जोशी

शाहीर रामजोशी  - राम जगन्नाथ जोशी (1772 ते 1812). त्यांचे घराणे वेदशास्त्र संपन्न पंडितांचे होते. वैदिक परंपरेतील रामने तमासगीर व शाहीर लोकांत वावरावे व त्यांच्यासाठी कवित्व रचना करून द्याव्यात हे त्यांच्या परिवारालाच मान्य नव्हे तर समाजालाही रुचणारे नव्हते. पण ते तमाशातच रमले. त्यांच्या रचनामध्ये संस्कृत प्रचुरता दिसून येते. त्यांनी शाहिरी वाङ्मयाला प्रतिष्ठा मिळवून दिली. ‘भला जन्म हा’ ही लावणी त्यांनी कवी मोरोपंताना म्हणून दाखविली त्याबद्दल त्यांनी त्यांना ‘कवीश्वर’ हे पदवी दिली. रामजोशी म्हणजे ‘लावणीकारांचा तुरा’.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

हरी नारायण आपटे

मराठी साहित्यातील प्रतिभावान कादंबरीकार, पत्रकार - नारायण हरी आपटे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! आज ११ जुलै रोजी मराठी साहि...